the kashmir files चित्रपटावरून aimimचे असदुद्दीन ओवेसी यांचं मोठं विधानं

0

दि.१७: सध्या देशात the kashmir files चित्रपट खूप चर्चेत आहे. द काश्मीर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांच्या द काश्मीर फाईल्स (the kashmir files) या चित्रपटाला प्रेक्षकांचे अखंड प्रेम मिळत आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाइल्समध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण आहे.

जे सत्य अनेक वर्षे लोकांच्या समोर आणलं गेलं नव्हतं ते आता ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून समोर आलं आहे, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे लोक हैराण झाले आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) केली आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाप्रमाणे देशाच्या विभाजनाच्या वेदना, आणिबाणीतील दु:ख आणि ‘ऑपरेशन गंगा’वरही चित्रपट निर्माण करावेत असंही आवाहन त्यांनी केलं आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.

“काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे पण जे १५०० हिंदू मारले गेले, जे काश्मिरी पंडित नव्हते, जे डोग्रा भागातील होते, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार?”, असा प्रश्न हैदराबादचे खासदार आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी उपस्थित केला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

एनडीटीव्हीशी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “चित्रपट पाहिल्यानंतर लोक मुस्लिमांविरोधात व्हिडीओ बनवत आहेत. देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष का वाढवला जात आहे? सोशल मीडियावर असे किती व्हिडीओ पडले आहेत, ज्यात लोक सिनेमागृहात उभे राहून मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत आहे, असं का होतंय?,” असे प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत.

पुढे ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी पंडित मारले गेले. माझ्याकडे सगळ्यांची नावं आहेत, जी मी देऊ शकतो. पण जे १५०० हिंदू मारले गेले, जे काश्मिरी पंडित नव्हते, जे डोग्रा भागातील होते, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार?, असा सवाल करत गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का,” असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला.

ओवेसी म्हणाले की, “मी अनेकदा लोकसभेत म्हटलोय की, तुम्ही कमिशन ऑफ इन्क्वायरी कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करा, सगळं समोर येईल की आतापर्यंत किती काश्मिरी पंडित स्थलांतरित झाले आणि का?, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सात वर्षांच्या काळात तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये पाठवलं, हे देखील सांगा, फक्त द्वेष पसरवू नका,” असं म्हणत ओवेसींनी मोदी सरकारवर टीका केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here