मशिदी आणि दर्ग्यांबाबत असदुद्दीन ओवेसींनी केली ही मागणी

0

दि.27: AIMIM चे असदुद्दीन ओवेसींनी (Asaduddin Owaisi) मशिदी आणि दर्ग्यावर हाय रिझॉल्यूशन कॅमरे लावण्याची मागणी केली आहे. मशिदींवर हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत आणि जेव्हा केव्हा एखादी धार्मिक मिरवणूक संबंधित भागांतून जाईल, तेव्हा तिचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे. जेणेकरून उपद्रव करणाऱ्यांची ओळख पटवता येईल, असे एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

थेट प्रक्षेपण व्हावे
 
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सर्व धार्मिक स्थळे, विशेषतः मशिदी आणि दर्ग्यांमध्ये हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत. जेव्हा एखादी धार्मिक मिरवणूक या धार्मिक स्थळांवरून जाईल, तेव्हा संबंधितांनी त्यांच्या सोशल मीडिया वेबसाइटवरून तिचे थेट प्रक्षेपण करायला हवे.

जेव्हा एखादी  धार्मिक मिरवणूक काढली जाते. तेव्हा, त्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण बघितल्यानंतर, लोकांना सत्य समजते. सांप्रदायिक घटनांदरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी नियमितपणे मुसलमानांना जबाबदार धरलेजाते, असेही ओवेसी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here