असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी यांना दिले चॅलेंज

0

दि.८: AIMIM चे असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चॅलेंज दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आपण टीआरएस, भाजपा आणि एमआयएमला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हिंमत असेल तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा” असं म्हणत चॅलेंज दिलं आहे. तसेच राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी “राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्येही हरणार आहेत. हिंमत असेल तर या आणि हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा, नाहीतर मेडकमधून नशीब आजमावून पाहा. पण तुम्ही वायनाडमध्ये हरणार आहात” असा सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी तेलंगणा दौऱ्यावर असताना आपण टीआरएस, भाजपा आणि एमआयएमला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आल्याचं विधान केलं होतं. त्याला आता ओवेसींनी प्रत्युत्तर देत जाहीर आव्हान दिलं आहे. 

भाजपा नेते अमित मालवीय (Amit Malviya) यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओ शेअर करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तेलंगणात शेतकरी रॅली सुरू होण्याआधीचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय? मला नेमकं काय बोलायचं आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याबाबत एक ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here