Satish Maneshinde: आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली ही मागणी

0

दि.28: आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी पीएम नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आर्यन खानच्या (Aryan Khan) प्रकरणाप्रमाणे रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणातही अशीच चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. 27 मे रोजी ‘मन्नत’मध्ये डबल सेलिब्रेशन करण्यात आले होते. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट मिळाली असून शाहरुखच्या लहान मुलगा अबराम खानचा वाढदिवस होता.

संपूर्ण खान कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आता आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणानंतर रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणातही अशीच चौकशी करण्याची मागणी केली आहे जी आर्यन खानच्या प्रकरणात करण्यात आली आहे. रिया आणि शोविककडे ड्रग्जही सापडले नाही. त्याची कोणतीही चाचणी झाली नव्हती.

आर्यनच्या वकिलाने दिली प्रतिक्रिया

सतीश मानशिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, नवाब मलिक यांच्या या प्रकरणाच्या राजकीय कोनावर मी भाष्य करू इच्छित नाही किंवा बोलू इच्छित नाही. मी फक्त एक वकील आहे. जवळपास तीन-चार अधिकाऱ्यांनी या प्रकरणात ज्या पद्धतीने कारवाई करायला नको होती, तशा पद्धतीने कारवाई केली. त्यांना त्याची गरजही नव्हती. त्यांनी असे का केले ते माहित नाही. त्याने असे का केले ते माहित नाही. शाहरुख खानच्या कुटुंबासाठी हा मोठा दिलासा आहे. ते सर्व अनेक संकटातून गेले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती करू इच्छितो. प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. हा राज्याचा किंवा केंद्राचा मुद्दा नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here