मुंबई,दि.29: क्रुझ ड्रग्स प्रकरणी अखेर आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मंजूर झाला आहे. आर्यन खानसह तिघांची आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत हायकोर्टाकडनं जारी केली. मुंबईउच्च न्यायालयाने प्रत्येकी 1 लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देत कठोर अटीशर्तीही लागू केल्या आहेत. निकालाची प्रत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NDPS कोर्टात सादर होताच कोर्ट सुटकेचे आदेश देणार आहे.
आर्यन खानची जेलमधून सुटका होऊन 26 दिवसांनी आपली घरी रवानगी होणार आहे. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला. एनसीबीने जामीन देण्यास कडाडून विरोध केला खरा पण त्यांच्या युक्तीवाद सपशेल अपयशी ठरला.
14 अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज (29 ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (28 ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आता आज आर्यन खान तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत. त्या किंवा तशा इतर कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये. तसेच आरोपींनी या गुन्ह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, तसेच दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा एकही अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत.