मुंबई,दि.28: आर्यन खानला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, पण आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात 3 ऑक्टोबरपासून अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज हा निर्णय दिला.
अरबाझ मर्चंट व मुनमून धामेचा यांनाही न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या उपलब्ध होणार असल्यानं या तिघांनाही आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.
या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर 7 जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. त्यांनतर या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. यामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री अनन्या पांडेच नावसुद्धा यामध्ये होतं पुढं आलं होतं. . आर्यन आणि अनन्याचे व्हॉट्सअप चॅट्स समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.