आर्यन खान ड्रग प्रकरणाच्या तपासात आढळल्या अनेक त्रुटी, NCB च्या अहवालात झाले उघड

0

मुंबई,दि.19: आर्यन खान (Aryan Khan) ड्रग प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी आढळल्या असल्याचे एनसीबीच्या (NCB) अहवालात उघड झाले आहे. ड्रग्ज प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरुखच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. ड्रग्ज प्रकरणात तब्बल 26 दिवस आर्यन खान कोठडीत होती. NCBकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान काही महिन्यांआधीच आर्यनची या केसमध्ये निर्दोश सुटका करण्यात आली मात्र आता या प्रकरणात NCBकडून मोठी माहिती समोर आली आहे.

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणार नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेचNCBने सर्वांना चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. दैनिक भास्करनं दिलेल्या माहितीनुसार, NCBनं दिल्ली मुख्यालयात आर्यन खान ड्रग्ज प्रकणार एक रिपोर्ट सादर केला आहे ज्यात या प्रकरणाची चौकशी योग्यरित्या झाली नाही असा दावा करण्यात आला आहे.

NCBच्या स्पेशल टीमनं सादर केलेल्या रिपोर्टमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, “या प्रकरणाची तेव्हाही चौकशी केली जात होती आणि आजही त्यावर काम केलं जात आहे. त्यांच्या कामात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात 7-8 अधिकाऱ्यांची भूमिका तपास पथकाला संशयास्पद वाटल्यानं त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. इतकंच नाही तर या आधीही दोन प्रकरणात या अधिकाऱ्यांची भूमिका संशायास्पद असल्याचं समोर आलं आहे. या संशायास्पद अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी मागण्यात आली आहे.

याच वर्षी मे महिन्यात आर्यन खानला एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली. त्याचप्रमाणे त्याच्या विदेश प्रवासाला मान्यता देत त्याचा पासपोर्टही त्याला परत देण्यात आला. आर्यन खान आणि पाच जणांविरुद्ध पुरेसे पुरावे सापडले नाहीत, असं स्पष्टीकरण NCBकडून देण्यात आलं होतं.

2 ऑक्टोबर 2021च्या रात्री आर्यन खानला NCBने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ शिपमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये छापेमारी करताना ताब्यात घेण्यात आलं. आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंटसह जवळपास 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. NCBकडून आर्यन खानला अटक करण्यात आली त्यानंतर 28 ऑक्टोबरला त्याचा जामीन मंजूर करण्यात आला आणि 29 ऑक्टोबरला तो घरी पोहोचला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here