Aryan Khan: विमानतळावरच आर्यन खानने केली लघुशंका?

0

दि.4: Fact Check: क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करून कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानला तुरुगांत राहावे लागले होते. या प्रकरणी आर्यनला जवळपास एक महिना तुरुंगातही रहावं लागलं होतं. आता आर्यन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसणारा व्यक्ती आर्यन खान असल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मिडीयावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, त्यात दिसणारा व्यक्ती हा आर्यन खान असल्याचे सांगितले जात आहे. हा कथित आर्यन खान नशेमध्ये आहे आणि अमेरिकेच्या विमानतळावर लघुशंका करताना दिसत आहे. या व्यक्तीला सोशल मीडियावर लोक आर्यन खान म्हणत आहेत आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. अनेकजण आर्यन खानला ट्रोल करू लागले आहेत. तर काही जण आर्यन खानचे नाव बदनाम केले जात असल्याचे म्हणत आहेत. 

वस्तुस्थिती अशी आहे की, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणारी ही व्यक्ती आर्यन खान नसून प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ‘ट्युबलाइट’ मध्ये काम केलेला अभिनेता ब्रॉन्सन पेलेटियर आहे. हा व्हिडिओ 2012 मधला आहे जेव्हा ब्रॉन्सनने लॉस एंजेलिस विमानतळावर नशेच्या अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी लघवी केली होती.

आर्यन खानला 2021 वर्ष जगातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रेटिंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर घेऊन गेले आहे. आर्यन खानला 3 ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवरून ड्रग केसमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर कित्येक प्रयत्नांनंतर आर्यनला मुंबई उच्च न्यायालयाने जामिन दिला होता. जवळपास महिनाभर आर्यन खान तुरुंगात राहिला होता. या प्रकरणामुळे आर्यन खानला गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सेलिब्रेटींमध्ये दुसरा क्रमांक मिळाला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here