नवी दिल्ली,दि.6: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपाचा प्रचार करणार असल्याची घोषणा केली पण याकरिता त्यांनी एक अट घातली आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर ‘जनता की अदालत’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपावर टीका केली.
केजरीवाल म्हणाले की, डबल इंजिन सरकार म्हणजे डबल लूट, डबल भ्रष्टाचार आणि बेरोजगारी. ते म्हणाले की, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या डबल इंजिन सरकारचा अंत होत आहे. तसेच झारखंड आणि महाराष्ट्रातील भाजपचं डबल इंजिन सरकार संपणार आहे असे केजरीवाल म्हणाले.
तर मी भाजपाचा प्रचार करणार | Arvind Kejriwal
केजरीवाल म्हणाले की गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच केले नाही. पुढच्या वर्षी मोदी 75 वर्षांचे होतील तेव्हा तरी त्यांनी काही कामं करावीत. केजरीवार यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले की दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी जर पंतप्रधान एनडीए शासित 22 राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा करतील तर मी भाजपसाठी प्रचार करेन असे केजरीवाल म्हणाले.