राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर राजकीय शत्रुत्वामुळे आपल्याला अटक करण्यात: संजय राऊत

ईडीच्या याचिकेवर संजय राऊतांचे न्यायालयात शपथपत्र

0

मुंबई,दि.30: राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर राजकीय शत्रुत्वामुळे आपल्याला अटक करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रामध्ये म्हटले आहे. पत्राचाळ प्रकरणात न्यायालयानं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध आहे. संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाचे पॉलिग्राफ टेस्टमध्ये खळबळजनक विधान

आता या प्रकरणात ईडीच्या याचिकेवर संजय राऊत यांनी आपलं उत्तर मुंबई उच्च न्यायालयात शपथपत्राच्या स्वरुपात सादर केलं आहे. या शपथपत्रामध्ये संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले आहे. संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांनी न्यायालयात शपथपत्र सादर केलं आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर राजकीय शत्रुत्वामुळे आपल्याला अटक करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बदललेली राजकीय परिस्थिती हीच आपल्या अटके मागचे मुख्य कारण असल्याचा दावा राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. गोरेगावातील पत्राचाळीचा पुनर्विकास हा प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याला हवा होता. म्हणूनच पत्राचाळीच्या पुनर्विकासासाठी आयोजित बैठकांना आपण हजर होतो. कोणत्याही प्रकल्पावरील चर्चेच्या बैठकीत सहभागी होणे हा गुन्हा ठरत नाही. या प्रकरणात गुन्हा झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे नसतानाही आपल्याला अटक करण्यात आली. राजकीय सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांना समन्स

दरम्यान राऊत यांना आता बेळगाव न्यायालयानं देखील समन्स पाठवलं आहे. राऊत यांनी 2018 मध्ये सीमावादावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बेळगाव न्यायालयानं संजय राऊत यांना समन्स पाठवलं आहे. त्यांना एक डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. राऊत न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे. यावरून संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत.

हल्ला करण्याचा कट असल्याचा आरोप

न्यायालयानं समन्स पाठवल्यानंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. समन्स पाठवून मला बेळगावात बोलावून नंतर माझ्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here