Appleची मोठी तयारी लवकरच आयफोनवर हे फीचर होऊ शकते उपलब्ध

0

सोलापूर,दि.4: Apple मोठी तयारी करत आहे. iPhone वर लवकरच AI फीचर उपलब्ध होऊ शकते. गुगल आणि सॅमसंगने त्यांचे एआय फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तुम्हाला Google Pixel 8 आणि Samsung Galaxy S24 मालिकेत अनेक AI वैशिष्ट्ये मिळतात. या वैशिष्ट्यांमुळे ॲपल कुठेतरी मागे पडत आहे. ॲपलच्या लेटेस्ट फोन्समध्ये असे कोणतेही AI फीचर देण्यात आलेले नाही.

तथापि, लवकरच Apple iPhone मध्ये AI फीचर दिले जाऊ शकते. Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक (Tim Cook) यांनी पुष्टी केली आहे की कंपनी जनरेटिव्ह एआय सॉफ्टवेअर वैशिष्ट्यांवर काम करत आहे. म्हणजेच आयफोनमध्ये AI फीचर उपलब्ध असेल. त्याचे तपशील जाणून घेऊया.

ॲपल एआय फीचर्सवर करत आहे काम

या आठवड्यात आयोजित ॲपल तिमाही कमाई कॉलमध्ये या वैशिष्ट्याबद्दल बोलले गेले आहे. टीम कुकने या बैठकीत सांगितले की ते जनरेटिव्ह एआय सॉफ्टवेअर फीचरवर काम करत आहेत. या वर्षाच्या अखेरीस ही सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. जनरेटिव्ह AI वर ऍपलच्या कामाची माहिती समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 

यापूर्वी मार्क गुरमनने माहिती दिली होती की iOS 18 Apple च्या iOS इतिहासातील सर्वात मोठे अपडेट असू शकते. याचा अर्थ आम्ही iOS 18 मध्ये AI वैशिष्ट्य पाहू शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

विश्लेषक मिन-ची कुओचा अंदाज आहे की ऍपलच्या विक्रीत घट होऊ शकते. आयफोनमध्ये कोणताही नवीन इनोव्हेशन नसणे हे त्याचे कारण आहे. जेथे इतर ब्रँडने फोल्डेबल फोन, फ्लिप फोन आणि AI वैशिष्ट्यांसह फोन लॉन्च केले आहेत. तर ॲपल असा कोणताही फोन देत नाही. 

ॲपलच्या सीईओने केलेली ही घोषणा स्मार्टफोन उद्योगात बदल घडवून आणू शकते. सध्या स्मार्टफोन बाजारात ॲपल आघाडीवर आहे. टिम कुकने त्यांच्या भाषणात अनेक वेळा जनरेटिव्ह एआयचा वापर केला. मात्र, त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here