दि.8: Appleचा ‘Peek Performance’ हा Event आज होणार आहे. यामध्ये परवडणाऱ्या आयफोन व्यतिरिक्त मॅक आणि इतर उत्पादनेही लॉन्च केली जाऊ शकतात. Apple आज वर्षातील पहिला लॉन्च कार्यक्रम आयोजित करणार आहे. ॲपलचा हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता सुरू होईल. या इव्हेंटमध्ये, कंपनीचा नवीन परवडणारा स्मार्टफोन iPhone SE 3 देखील 5G कनेक्टिव्हिटीसह लॉन्च केला जाईल.
परवडणाऱ्या iPhone SE 3 व्यतिरिक्त, Apple Spring 2022 इव्हेंटमध्ये इतर उत्पादने देखील लॉन्च केली जाऊ शकतात. या इव्हेंटमध्ये iPad Air, iPhone SE 3 आणि iPhone 13 चे नवीन कलर व्हेरिएंट लॉन्च केले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार, या इव्हेंटमध्ये iPhone 13 चा ग्रीन कलर ऑप्शन लॉन्च केला जाऊ शकतो.
गेल्या वर्षीचा पॅटर्न बघितला तर या इव्हेंटमध्ये आयफोन 13 मिनीचा ग्रीन कलर ऑप्शनही लॉन्च केला जाऊ शकतो. हा कलर पॅटर्न आयफोन 13 प्रो सीरीजसाठी लॉन्च केला जाईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
या कार्यक्रमात मॅकचा नवा अवतार मॅक स्टुडिओ लॉन्च केला जाऊ शकतो. यूट्यूबर ल्यूक मियानी (Luke Miani) यांनी याबाबत माहिती दिली आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमन यांनीही ॲपलच्या स्प्रिंग इव्हेंटमध्ये मॅक स्टुडिओ लाँच होणार असल्याची माहिती दिली आहे. कंपनी यामध्ये स्टुडिओ डिस्प्ले नावाने नवीन एक्सटर्नल डिस्प्ले देखील लॉन्च करू शकते.
असे मानले जाते की नवीन डिस्प्ले Pro Display XDR ची पुढील आवृत्ती असू शकते आणि ते अधिक परवडणारे असू शकते. या इव्हेंटमध्ये 13-इंचाचा MacBook Pro देखील लॉन्च केला जाऊ शकतो. काही लीक्सनुसार यामध्ये M2 चीप वापरली जाऊ शकते.