स्क्रिन साफ करण्यासाठी Apple ने केले कापड लाँच

0

दि.20: आयफोन (Iphone) वापरणे हे एकप्रकारे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. ॲपल कंपनीचे स्मार्टफोन, स्मार्टवॉच किंवा इतर गॅजेट्स आणि ॲक्सेसरीज या केवळ वस्तू नाही तर एकप्रकारे स्टेटस सिम्बॉल आहे. मात्र ॲपलचा चाहता वर्गही मोठा आहे. ॲपलच्या वस्तूच्या किंमतीपेक्षा त्याची सवय अनेकांना झाली आहे. ॲपलने अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी अनेक उत्पादने लाँच केली, ज्यात त्यांनी एक वस्तू लाँच केले ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कंपनीने एक खास पॉलिशिंग कापड (Apple Polishing Cloth) लाँच केले आहे. ज्याचा वापर करुन यूजर्स डिव्हाइसचा डिस्प्ले सुरक्षितपणे आणि नीट स्वच्छ करू शकतात.

हा केवळ एक कापड असला तरी आता ॲपलचा आहे म्हणजे त्यांची किंमतही तशीच असणार. कंपनीने या मायक्रो फायबर कापडाची किंमत 19 डॉलर म्हणजे सुमारे 1,424 रुपये ठेवली आहे. यूजर्सना ते स्वतंत्रपणे खरेदी करावे लागेल. तर मायक्रोसॉफ्ट आपल्या प्रीमियम लॅपटॉपसह मोफत मायक्रोफायबर कापड पुरवते.

ॲपलने आपल्या वेबसाइटवर या फॅब्रिकबद्दल सांगितले आहे की ते खूप मऊ आणि नॉन एब्रेसिव्ह आहे. नॅनो-टेक्सचर्ड ग्लास असलेल्या कोणत्याही Apple डिव्हाइस याद्वारे साफ केले जाऊ शकते. मात्र, कंपनीने या फॅब्रिकबाबत फारशी माहिती दिलेली नाही. यासह, ॲपलचे पॉलिशिंग कापड ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विकल्या जाणाऱ्या स्वस्त मायक्रोफायबर कापडापेक्षा वेगळे कसे आहे हे देखील सांगितले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here