Bhagwat Karad: प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केले बेशुद्ध झालेल्या कॅमेरामॅनवर उपचार

0

नवी दिल्ली,दि.17: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या समजूतदारपणामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले. यापूर्वीही डॉ. भागवत कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत एका विमानप्रवाशाचे प्राण वाचले होते. कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला भागवत कराड यांनी आरोग्यविषयक सहकार्य केले. केंद्रीय मंत्री असलेल्या भागवत कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत एका कॅमेरामनचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री हे पेशाने शल्य-चिकित्सक आहेत.

केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) हे दिल्लीतील ताज मानसिंग येथे मुलाखत देत होते. ही चर्चा कव्हर करण्यासाठी आलेला एक फोटोग्राफर बेशुद्ध पडला. हे पाहून डॉक्टर कराड तातडीने मदतीसाठी पोहोचले आणि त्यांनी नाडी तपासली. यानंतर त्याने पल्स रेट वाढवण्यासाठी कॅमेरामनचे पंजे दाबण्यास सुरुवात केली.

सुमारे 5-7 मिनिटांनी कॅमेरामनची प्रकृती सुधारली. यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी मिठाई खाऊ घातली. हे प्रकरण समोर आल्यानंतरच लोक त्यांचे कौतुक करत आहेत. योगगुरू स्वामी रामदेव यांनीही डॉ. कराड यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही यासंदर्भात ट्विट करत भागवत कराड यांचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातही असाच काहीचा प्रकार घडला होता. दिल्ली ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या डॉ.कराड यांनी विमानातील एका प्रवाशाला अशीच मदत केली होती. त्यांनी विमानाच्या आपत्कालीन किटमध्ये उपस्थित प्रवाशाला इंजेक्शन दिले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले होते. भागवत कराड हे महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार आहेत आणि जुलै 2021 मध्ये मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here