Anupam Kher: अभिनेता अनुपम खेर यांच्या मातोश्रींचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स

0

दि.१५: Anupam Kher: Pushpa: The Rise (पुष्पा द राईज) या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर Pushpa: The Riseने (‘पुष्पा द राईज’) कोट्यवधींची कमाई केली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा ‘पुष्पा द राईज'(Pushpa: The Rise) या सिनेमाचा प्रभाव अनेकांवर दिसून आला.

इन्स्टाग्राम रिल्समध्ये तर पुष्पा सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सवर रिल्सचा नुसता पाऊस पडत आहे. यात आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या मातोश्रींचीही भर पडली आहे. अनुपम खेर यांच्या मातोश्री दुलारी देवी यांनी ‘पुष्पा’ सिनेमातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताचा एक व्हिडिओ खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर युजर्स आणि अनुपम खेर यांचे चाहते देखील प्रतिक्रिया देत आहेत. 

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

सोशल मीडियावर तुम्ही सक्रिय असाल तर पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली गाण्यातील हूक स्टेप सध्या किती व्हायरल झाली आहे याची कल्पना तुम्हाला असेलच. सर्वसामान्यांपासून बॉलीवूड कलाकारांपर्यंत प्रत्येकजण पुष्पातील गाणी आणि संवादांचे इन्स्टा रिल्स तयार करुन पोस्ट करत आहे. अनुपम खेर यांच्या आई दुलाी देवी यांचाही असाच एख व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुमच्यातील टॅलेंटला वयाचं बंधन नसतं हेच या व्हिडिओतून दिसून येतं.

अनुपम खेर यांच्या मातोश्रींनी श्रीवल्ली गाण्याची हूक स्टेप करत अनेकांची मनं जिंकली आहेत. दुलारी देवी यांचा हा व्हिडिओ सर्वात आधी अनुपम खेर यांच्या भाचीनं म्हणजेच वृंदा खेर यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर अनुपम खेर यांनीही त्यांच्या अकाऊंटवर दुलारी देवी यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अनुपम यांनी त्यांच्या मातोश्रींचा व्हिडिओ शूट केल्याबद्दल वृंदा खेर यांचेही आभार मानले आहेत. अभिनेत्री कंगना रणौतनंही हा व्हिडिओ लाइक केला आहे. तर अनेकांनी व्हिडिओ खूप क्यूट असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी खेर यांच्या मातोश्री रॉकस्टार असल्याचं म्हटलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here