ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे केले कौतुक

0

मुंबई,दि.9: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी (Anna Hazare) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर राजकीय नेते देखील एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तसेच सर्व स्थरांतून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा येत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंना फोनवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचे कौतुकही केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केले कौतुक

‘तुमच्या कामाच्या बातम्या वाचतो, चांगले काम करत आहात. असंच काम पुढ सुरू ठेवा. आमचा आशिर्वाद चांगल काम करणाऱ्या लोकांच्या पाठिमागे कायम आहे, असं कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अण्णा हजारे यांनी केले.  

‘तळागाळातून परिवर्तन होणे गरजेचे होते. तुमची जोडी चांगली काम करते. ही जोडी महाराष्ट्राला चांगली मिळाली आहे. तुमचा महाराष्ट्रासाठी एक-एक क्षण महत्वाचा आहे. तो क्षण तुम्ही राज्याच्या समाजकारणासाठी लावा, असंही अण्णा हजारे म्हणाले. 

संजय राऊत यांनी दिल्या शुभेच्छा

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकरांनी त्यांना आज एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. यावर माझे सहकारी म्हणून तसेच एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतो. आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहणार, मात्र खाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, तर त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here