सोलापूर,दि.२४: Anjali Damania On Nitin Gadkari | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची पोल खोल करणार आहेत. त्यांनी Xवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. भाजपा नेते नितीन गडकरी हे त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते त्यांची स्तुती करतात. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी अनेकवेळा गडकरी यांचे कौतुक केले आहे.
अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत गडकरी यांची पोल खोल करणार असल्याचे म्हटले आहे. काल (दि.२३) दमानिया यांनी “उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे.” अशी पोस्ट केली होती.
मात्र आज (दि.२४) दमानिया यांनी राज्यातील भीषण पूरस्थितीमुळे गडकरींविरुद्ध उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे. (Anjali Damania News Today)
अंजली दमानिया यांची पोस्ट | Anjali Damania On Nitin Gadkari
गडकरींविरुद्ध पत्रकार परिषद मी उद्या घेईन, महाराष्ट्रात भीषण पूर परिस्थिती आहे. लोकांची घरे आणि पीकं उध्वस्त झाली आहेत. त्यांना आज आम्ही आमच्यापरेने मदत पोहोचवू.
अशात मी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं योग्य होणार नाही. मी आज संध्याकाळच्या ऐवजी उद्या सकाळी गडकरींविरुद्ध पत्रकार परिषद घेईन.








