नाशिक,दि.7: सीमावादावरून नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी (Aniket Shastri Joshi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावमधल्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेकीमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
Sharad Pawar | काय म्हणाले होते शरद पवार?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. बेळगाव सीमाभागात (Belgaum Border) कन्नड रक्षण वेदिके संघटनेने मांडलेल्या उच्छादानंतर, शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar PC) घेऊन सीमाप्रश्नी आक्रमक भूमिका मांडली.
Aniket Shastri Joshi | काय म्हणाले महंत अनिकेत शास्त्री जोशी?
नाशिकचे (Nashik) महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री पद भूषविलेले आहेत. त्याचबरोबर केंद्रातील अनेक उच्च पदे त्यांनी भूषाविलेले आहेत. महाराष्ट्र्र कर्नाटक प्रश्नी 48 तासांचा अल्टिमेटम दिला, अन सीमा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मात्र शरद पवार यांची पन्नास वर्षाची कारकीर्द ही राजकारणाशी संबंधित आहे, तर 40-50 वर्षांमध्ये हा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि ते आता 48 तासाचे मुदत देत आहेत, हे कोणत्या तत्वात बसते, असा सवाल शास्त्री यांनी केला आहे.
गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांना काही झाले तर त्याची जबाबदारी शरद पवारांची असेल
अनिकेत शास्त्री जोशी म्हणाले, आज दत्त जयंती असून महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त हे गाणगापूरला जात असतात. गाणगापूरला मोठी यात्रा असल्याने लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते. मात्र याचवेळी शरद पवार यांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांना जर काही कमी जास्त झालं तर याची सर्व जबाबदारी ही शरद पवार यांची असेल, महाराष्ट्राचा हा वाद चिघळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्यांनी आज दत्त उपासना करावी असं त्यांना सांगू इच्छितो, असे आवाहनच महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी केले आहे.