सोलापूर,दि.29: ANI Twitter Locked: इंस्टंट ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने देशातील आघाडीची वृत्तसंस्था एएनआयचे (ANI) ट्विटर खाते लॉक केले आहे. एशियन न्यूज इंटरनॅशनलचे ट्विटर अकाउंट शनिवारी दुपारी अचानक लॉक झाले. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्विट करून अकाऊंट लॉक झाल्याची माहिती दिली आहे.
वृत्तसंस्था एएनआयचे ट्विटर खाते केले लॉक | ANI Twitter Locked
त्यांनी सांगितले की, ट्विटरने अकाऊंट लॉक करण्यामागे क्रिएटरचे किमान वय 13 वर्षे असण्याचा नियम सांगितला आहे. स्मिता प्रकाश यांनी या पोस्टमध्ये ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क यांना देखील टॅग केले आहे.
एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “@ANI फॉलोअर्ससाठी वाईट बातमी, ट्विटरने 7.6 दशलक्ष फॉलोअर्स असलेली भारतातील सर्वात मोठी वृत्तसंस्था खाते बंद केले आहे आणि हा मेल पाठवला आहे- आम्ही 13 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहोत! आधी आमची गोल्ड टिक काढून घेतली होती, त्याऐवजी ब्लू टिक लावली होती आणि आता खाते लॉक झाले आहे. ट्विटर खाते उघडत नाही. प्रोफाइल उघडल्यावर, This account doesn’t exist
(हे खाते अस्तित्वात नाही) असा संदेश दिसतो.
स्मिता प्रकाश यांनी दुसर्या ट्विटमध्ये लिहिले की, “लक्ष द्या ट्विटर, तुम्ही कृपया ANI हँडल रिस्टोअर करू शकता का. आमचे वय 13 वर्षांपेक्षा कमी नाही.”