Andheri East By Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी

0

मुंबई,दि.17: Andheri East By Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबत घोषणा केली. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, यामुळे मुरजी पटेल यांचे समर्थक नाराज झाले असून, त्यांनी मनसेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

पक्षाने अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्यामुळे भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्रानंतरच मुरजी पटेल यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, असे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, ‘राज ठाकरे मुर्दाबाद’, ‘मनसे हाय हाय’ अशी घोषणाबाजी पटेलांचे कार्यकर्ते करत आहेत.

भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर, पटेल म्हणतात की, मला पक्षाने उमेदवारी दिली होती, आता माघार घ्यायला सांगितली. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने निर्णय सांगताच एका मिनिटाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला आहे, असं मुरजी पटेल म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here