“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंहासनावर सुद्धा बसवणार का?”

1

पुणे,दि.14: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंहासनावर सुद्धा बसवणार का?” असा सवाल ब्राम्हण समाजाचे नेते हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनी पीएम मोदींचा सत्कार केला. प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप पंतप्रधान मोदींना घालून स्वागत केले. हा सत्कार करणे प्रफुल्ल पटेलांच्या चांगलाच अंगलट आलाय.

काय म्हणाले आनंद दवे?

प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती महाराजांचा अवमान करणारी आहे असा हल्लाबोल आता हिंदू महासभेने केलाय. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही लाचारी कुठून आली असा प्रश्नही ब्राम्हण समाजाचे नेते हिंदू महासभेचे आनंद दवेंनी उपस्थित केलाय. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का असा संतप्त सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केलाय.

संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये असा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप कोणत्याही कपड्यावर घालणं ही न शोभणारी गोष्ट आहे. पंतप्रधान महोदय छत्रपती नाहीत. प्रफुल पटेल तुम्हाला समजलं पाहिजे, छत्रपतींचा जिरेटोप कधी घातला जातो असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला आहे. 


1 COMMENT

  1. महाराजांनी कधीच खोटे वाक्य भाष्य केले नाहीत, कधीच जाती दुवेश ही ठेवला नाही।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here