Ananad Mahindra | कधीच भारताच्या नादी लागू नका: आनंद महिंद्रा

0

मुंबई,दि.4: Anand Mahindra: अदानी समूहाच्या मदतीला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे अप्रत्यक्षरित्या धावून आले आहेत. शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने एका अहवालात स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अहवाल समोर आल्यापासून अदानी ग्रुपवरून जागतिक माध्यमांमध्ये अनेक अंगांनी चर्चा केली जात आहे.

अदानी समूहाच्या मदतीला आनंद महिंद्रा आले धावून | Ananad Mahindra

या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या मदतीला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे अप्रत्यक्षरित्या धावून आले आहेत. सोशल मीडियात कमालीचे सक्रीय असलेले आनंद महिंद्रा नेहमीच यशस्वी गाथा, प्रेरणा देतील अशा स्टोरीज शेअर करत असतात. मात्र, आज त्यांनी अप्रत्यक्ष अदानी समूहाच्या मदतीला धावून जाताना जागतिक माध्यमांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. अर्थात, त्यांनी केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारताच्या नादी कधीही लागू नका

आनंद महिंद्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “उद्योग क्षेत्रातील सध्याची आव्हाने जागतिक आर्थिक महाशक्ती बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला खीळ घालतील की नाही, यावर जागतिक मीडिया अंदाज लावत आहे. भूकंप, दुष्काळ, मंदी, युद्धे, दहशतवादी हल्ल्यांना भारत तोंड देत असताना मी दीर्घकाळ पाहत आलो आहे. मी एवढेच सांगेन, भारताच्या नादी कधीही लागू नका.”

दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चकडून करण्यात आलेल्या खळबळजनक आरोपांमुळे समूहाच्या कंपन्यांमधील बाँड आणि शेअर्स खाली आले. हिंडेनबर्ग रिसर्चने स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हिंडेनबर्ग रिसर्चकडून अदानी ग्रुपवर संशोधन सुरु होते. हिंडेनबर्गने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल 1 लाख कोटींनी कमी झाले आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा शेअर्समध्ये घसरण झाल्याने दोन दिवसात बाजार भांडवल 4 लाख कोटींनी कमी झाले.

अदानी समुहाच्या प्रमुख अदानी एंटरप्रायझेससह 10 कंपन्यांमध्ये मिळून 110 अब्ज डाॅलरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. क्रेडिट सुईस आणि सिटी ग्रुपने अदानींच्या बाँडवर कर्ज देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरणीला मॅक्रो इकॉनॉमिक दृष्टिकोनातून “चहाच्या पेल्यातील वादळ” असल्याचे म्हटले आहे. शेअर्स मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे गौतम अदांनी टॉप-20 अब्जाधीशांच्या यादीतूनही बाहेर पडले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी मुकेश अंबानींनी टॉप-10 च्या यादीत प्रवेश केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here