अमरावती कथित लव्ह जिहाद प्रकरण, तरुणीने सांगितले खासदार नवनीत राणा खोटं बोलतायेत

0

अमरावती,दि.9: महाराष्ट्रातील अमरावती येथील कथित लव्ह जिहाद प्रकरणात बेपत्ता झालेल्या तरुणीने अखेर राजापेठ पोलीस ठाण्यात येऊन खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य खोटे असल्याचे म्हटले आहे. घरातील सदस्यांमधील वादाला कंटाळून आपण एकटीच घरातून निघून गेल्याचे निवेदन या तरुणीने दिले आहे. या प्रकरणाला लव्ह जिहादसारखी घटना असे नाव देऊन माझी बदनामी करू नका, असे तरुणीने म्हटले आहे.

अलीकडेच अमरावती जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या 19 वर्षीय तरुणी संदर्भात नवनीत राणा यांनी लव जिहादचे रूप देत राजापेठ पोलिस ठाण्यात खळबळ उडवून दिली होती. या गोंधळाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सध्या या मुलीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार, ती स्वतः घर सोडून रागाच्या भरात निघून गेली होती.

मुलीने हात जोडून अफवा पसरवू नका अशी विनंती केली. तरुणी म्हणाली की, खासदार नवनीत राणा माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत. मुलगी म्हणाली, “मी असे काही केले नाही. लव्ह जिहादच्या सर्व चर्चा चुकीच्या आहेत.” याप्रकरणी तरुणीच्या वक्तव्यानंतर भाजपचे स्थानिक नेते आणि अपक्ष खासदार नवनीत राणा तोंडघशी पडताना दिसत आहेत.

खरं तर, महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 6 सप्टेंबर रोजी एका मुलीची हरवल्याची तक्रार नोंदवली गेली, त्यानंतर पोलीस त्याचा तपास करत होते. मात्र राजकारण्यांनी याला लव्ह जिहादची घटना म्हणत पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाणे गाठून गोंधळ घातला, त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.

दरम्यान, पोलिसांनी मुलीची माहिती गोळा करून तिला काल सातारा पोलिसांच्या मदतीने परत आणले. मुलीने राजापेठ पोलीस ठाणे गाठून कुटुंबातील वादामुळे रागाच्या भरात घरातून एकटी निघून गेल्याचे जबाब दिला. सोबत तिच्या बरोबर कोणीही नसल्याचे मुलीने सांगितले. ती एकटीच निघून गेली होती.

पोलिसांना दिलेल्या जबाबात तरुणीने म्हटले आहे की, “मला कोणीही आमिष दाखवून कुठेही नेले नाही. लव्ह जिहादच्या नावाखाली खासदार माझी विनाकारण बदनामी करत आहेत.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here