Amol Mitkari Tweet: अमोल मिटकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा काढला खोडून

Amol Mitkari News: अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ केला होता ट्विट

0

नागपूर,दि.25: Amol Mitkari Tweet: आमदार अमोल मिटकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा खोडून काढला आहे. मिटकरी यांनी 21 डिसेंबरला एक व्हिडिओ ट्विट करत आरोप केला होता. आमदार निवासाच्या कॅन्टिनमधल्या शौचालयात भांडी आणि कपबश्या धुतानाचा व्हिडिओ आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केला होता.

एकनाथ शिंदे यांनी दिले होते चौकशीचे आदेश | Amol Mitkari Tweet

या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात प्राथमिक तपास केला, त्यानंतर मिटकरी यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ आमदार निवासातील नसल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण

आमदार मिटकरी यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओत टाईल्स क्रीम कलरच्या आहेत, तर फ्लोअरला ग्रॅनाईट लावलेलं आहे. आमदार निवासातल्या सगळ्या शौचालयांमध्ये ग्रे रंगाच्या टाईल्स आहेत. तसंच फ्लोअर सुद्धा ग्रॅनाईटचा नाही, त्यामुळे हा व्हिडिओ आमदार निवासातला नसल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

जाहिरात

अमोल मिटकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा काढला खोडून | Amol Mitkari News

दरम्यान मिटकरी यांनी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा खोडून काढला आहे. ‘सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार निवास मधील शेअर केलेल्या टॉयलेट मधील किळसवाणा प्रकाराचा व्हिडिओ तिथला नसल्याचे पत्रकारांना खोटे सांगितले असले तरी वस्तुस्थिती उद्या पत्रकार बांधवांना स्वतः दाखवुन देईल त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा’, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. तर गिरीश महाजन यांनी अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here