न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अमोल मिटकरी यांनी दिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.९: मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा एक दिवसाचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने (Special PMLA Court) फेटाळला आहे. उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने करण्यात आला. परंतु कोर्टाने हा अर्ज नाकारला त्यामुळे उद्याच्या मतदानातनवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार नाही. 

न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने न्यायालयात दाखल करण्यात आला होता. परंतू, कोर्टाने अर्ज नाकारल्यामुळे दोघांना मतदान करता येणार नाही. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नसताना सुद्धा त्यांना मताधिकार नाकारणे ही संविधानाची पायमल्ली ठरत नाही का? जो निकाल आलाय तो आश्चर्यकारक आहे.”

दुसऱ्या ट्विटमध्ये मिटकरी म्हणतात की, “संविधानिक अधिकार कुणालाही हिराऊन घेता येत नाही. लोकशाहीत मताधिकाराला महत्व आहे. दोघांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. उद्या भाजपाला पळता भुई थोडी होणार! तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक…” अशी टीकाही त्यांनी ट्विटद्वारे भाजपवर केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here