Amol Mitkari On BJP: देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात

Amol Mitkari: BBC च्या कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडी

0

मुंबई,दि.14: Amol Mitkari On BJP: ‘बीबीसी‘च्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. सूत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयसोडून घरी जाण्यास सांगण्यात आले. यानंतर आता या कारवाईवरून विरोधक आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. अलीकडेच बीबीसीने पंतप्रधान मोदींवर तयार केलेल्या एका माहितीपटावर बंदी घालण्यात आली. (Politics)

विरोधी पक्षाकडून टीका | Politics

BBC च्या कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडी पडल्यानंतर विरोधी पक्षाकडून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटावरून वाद निर्माण झाला होता. या माहितीपटावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला.

पाप झाकण्यासाठी BBC कार्यालयावर IT धाडी | Amol Mitkari On BJP

अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यात, देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात ! अदानी चे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारकडून बीबीसी कार्यालयावर IT च्या धाडी.. मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खुन ! जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे, असे ट्विट करत अमोल मिटकरींनी टीका केली. तसेच या ट्विटसह जागो भारतवासी असा हॅशटॅग दिला आहे. 

मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याच कारणामुळे भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.

दरम्यान,  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बीबीसीवरील कारवाईवरून मोदी सरकारवर टीका केली. BBC ने मोदींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आणि लगेच BBC च्या कार्यालयावर IT च्या धाडी पडू लागल्या. 56 इंचाच्या छाती किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले, अशी खोचक टीका पटोलेंनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here