नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022; अमोल मिटकरी

0

मुंबई,दि.30: मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

भाजपाने आपल्या धक्कातंत्रानुसार घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी खोच शब्दांमध्ये शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर टीका केलीय. मिटकरी यांनी ट्विटरवरुन दोन ट्विट करत या निर्णयावर भाष्य केलं आहे.

“फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल,” असा टोला मिटकरी यांनी पहिल्या ट्विटमध्ये लगावलाय. तर दुसऱ्या ट्विटमध्ये मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या न्यायप्रविष्ठ असलेल्या निकालाकडे इशारा केलाय. 16 बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भातील खटल्याची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार असल्याने याच तारखेचा उल्लेख करत मिटकरींनी, “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022” असं म्हटलंय. याच ट्विटमध्ये पुढे, “देवेंद्र फडणवीस यांचे मास्टर माईंड आहेत,” असंही म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये, “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजपा आणि 16 अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला एक मोठा गट आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल,” असं सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here