Amol Mitkari: राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांचे देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

0

दि.24: राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ED ने राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली आहे. न्यायालयाने 3 मार्च पर्यंत नवाब मलिक यांना कोठडी सुनावली आहे. मलिक यांच्या अटकेविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले असून केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

दुसरीकडे भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिकाही महाविकास आघाडीने घेतली आहे. आता, भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करुन फडणवीस दाम्पत्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.



ॲक्सीस बँकप्रकरणाची तक्रार ईडीकडे 3 वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. पण, अद्यापही दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे. ‘4 सप्टेबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला, त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही.  ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?’, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here