Amol Mitkari: आमदार अमोल मिटकरी यांचे शिवसेना बंडखोर आमदारांबाबत मोठं वक्तव्य

0

अकोला,दि.31: राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवसेना बंडखोर आमदारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून यंदा कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी थाटात, वाजत-गाजत गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्यातील घराघरात गणपत्ती बाप्पा विराजमान झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरात गणरायाचं आगमन झालं आहे. या आगमन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय चर्चांबद्दल राष्ट्रवादीची भूमिका सांगितली. तसेच, बंडखोर आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे गटाला राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून, शिवसेनेतील बंडखोर आमदारांना टार्गेट करून त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याची नवी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे प्लॅनिंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मदत करण्यासाठी आहे की, डाव उलटवण्यासाठी आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं दिसून येते. याबाबत बोलताना अमोल मिटकरी यांनी प्लॅन सांगितला. 

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर राष्ट्रवादीत आणन्यासाठी राष्ट्रवादीने प्लॅन आखल्याच्या चर्चा सुरु आहेत. हा प्लॅन नेमका काय आहे? या संदर्भात मिटकरी यांना विचारले असता, असे लोक आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here