हैदराबाद,दि.13: तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिची चार वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.
या प्रकरणी अभिनेत्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला प्रथम नामपल्ली लोअर कोर्टात नेण्यात आले, जिथे कोर्टाने अभिनेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर अल्लू अर्जुनने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली, जिथे तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला मोठा दिलासा दिला. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
संध्या थिएटरमधील घटनेबाबत, एका तक्रारदाराने एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये प्रीमियरच्या वेळी त्याची पत्नी आणि मुले थिएटरमध्ये उपस्थित होते. सुरक्षा व्यवस्था अपुरी पडल्याने खासगी सुरक्षा रक्षकांना गर्दी हाताळता आली नाही. या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे मूल जखमी झाले. चेंगराचेंगरीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. तथापि, पोलिसांनी नंतर सांगितले की पुरेसा बंदोबस्त केला गेला नाही आणि अभिनेत्याच्या आगमनाची माहिती दिली गेली नाही असा दावाही केला. यावर संध्या थिएटर व्यवस्थापनाने दोन दिवसांपूर्वी पुष्पा अभिनेत्याच्या आगमनाची माहिती देणारे पत्र दाखवून सुरक्षा व्यवस्थेची मागणीही केली होती.