मुंबई,दि.१८: ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलमा सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन करणार आहे तसे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. सध्या राज्यात भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलामा या संघटनेन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील मशिदीवर लाऊडस्पीकर वापरासाठी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमाचे पालन करु असं देखील या पत्रात म्हटलं आहे.
मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना ज्या मशिदींनी परवानगी मागितली आहे त्यांना मुभा देण्याची सूचना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी द्याव्या अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. आम्ही मशिदीच्या ट्रस्टींना तात्काळ परवानगीसाठी पोलिसांना अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करत आहोत.
आपला प्रार्थनेला विरोध नसून लाऊड स्पीकरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायला हवे असे राज ठाकरे म्हणाले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसेल तर आम्हीही भोंग्यावर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.
Home महाराष्ट्र ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलमा करणार सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन, पोलीस आयुक्तांना दिले...