सोशल मीडियावर व्हायरल होतोय अक्षया देवधरचा व्हिडिओ ‘याड लागलं’

0

दि.29 : सोशल मीडियावर अभिनेत्री अक्षया देवधरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहोचली आहे. अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Devdhar) आपला एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर(Instagram Video) केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच याड लागलं आहे. हा जबरदस्त रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षया सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. अक्षया देवधर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपले ग्लॅमरस, ट्रॅडिशनल फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना खुश करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेअर केला आहे. यामध्ये अक्षया एका झोपाळ्यावर झोका घेताना दिसत आहे. यामध्ये ती लाल-काळया रंगाच्या नऊवारी साडीमध्ये दिसून येत आहे.

तसेच अक्षयाने साडीवर साजेसे पारंपरिक दागिनेही घातले आहेत. शिवाय केसांचा अंबाडाही बांधला आहे. कपाळावरची चंद्रकोर तिच्या सौंदर्यात चार चाँद लावत आहेत. हा रील ‘सैराट’ च्या जबरदस्त गाजलेल्या ‘याड लागलं’ या गाण्यावर बनवण्यात आला आहे. अक्षयाचं सौंदर्य आणि त्याला साजेसे गाण्याचे या एकत्र संयोगाने रसिक घायाळ होत आहेत. अक्षयाने यापूर्वीहि अनेक रील्स बनवले आहेत. त्या प्रत्येक व्हिडीओमधील अभिनेत्रीचा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावतो. ट्रॅडिशनल असो किंवा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये अक्षया चाहत्यांना तितकीच पसंत पडते. चाहते अक्षयाच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here