Ajit Pawar On Gautami Patil: गौतमी पाटीलचा बैलासमोर डान्स, अजित पवार म्हणाले…

0

पुणे,दि.29: Ajit Pawar On Gautami Patil: गौतमी पाटील (Gautami Patil) नावाची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती असतेच असते. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने डान्स केला आहे. डान्सचा तो व्हिडीओ समाज माध्यमावर तुफान व्हायरल होत आहे.

गौतमीही कोणताही कार्यक्रम नाकारत नाही. मग वाढदिवसाचा कार्यक्रम असो की सार्वजनिक कार्यक्रम. मुळशीत तर गौतमी चक्क बैलासमोर नाचली. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमी लचकत, मुरडत नाचली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहे बावऱ्या

बावऱ्या बैल हा शर्यतीचा बैल आहे. या बावऱ्याने अनेक शर्यती गाजवल्या आहेत. गावचा सर्वात लाडका हा बैल आहे. मानाचा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सर्वच गावकरी या बैलाची राखण करतात. त्याची देखभाल करतात. गावची शान असलेल्या या बैलाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेक लोक येत असतात. त्यामुळे हा बैल नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळेच या बावऱ्या बैलासाठी थेट गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar On Gautami Patil

बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमीने डान्स केला याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षनेते अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारला. त्यावर ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय,’ अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.

‘यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का रात्री?’ या वक्तव्यावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “अनेक गावांत यात्रा, जत्रा सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. त्यामुळे सध्या गौतमीचं नाव गाजत असून, पाटलीबाईंना आणा, याबद्दल मी सुचवलं होतं. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की बोलवावे,” असं अजित पवार म्हणाले.

“बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे,” असेही अजित पवारांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here