नागपूर,दि.18: Ajit Pawar News Today | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूरमध्ये उद्या 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला आहे.
अजित पवार यांनी साधला राज्य सरकारवर निशाणा | Ajit Pawar News Today
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकारपरिषदही झाली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar News) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पवारांनी यावेळी सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे आदी मुद्यांवरून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं.
हेही वाचा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आयकर विभागाचा अजित पवार कुटुंबाच्या मालमत्तेबाबत घेतला हा निर्णय

काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar News Today
आज राज्यात ग्रामपंचायतचे मतदान असल्याने अनेक आमदार आज सहभागी झाले नाहीत. उद्या आमदार सहभागी होतील. शिंदे-फडणवीस सरकार येऊन सहा महिने झाले आहेत. मात्र, या सरकारकडून अपेक्षित काम झालेलं नाही. दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांकडे महापुरुषांवर वारंवार बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यावर माफीही मागायला तयार नाहीत. सीमाप्रश्नावर देखील या सरकारची भूमिका ठोस नाही. जो प्रश्न चर्चेतून सुटायला हवा, तिथं तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. राज्यातील गावं दुसऱ्या राज्यात जाण्याबद्दल ठराव करत आहेत. त्यावरही सरकारने भूमिका घेतली नाही. सिमा प्रश्नावर गेल्या 62 वर्षात गावांनी कर्नाटक मध्ये जातो अस म्हंतल नाही, सरकार आपली योग्य बाजू मांडत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सरकार खोके सरकार सोबतच स्थगिती सरकार: अजित पवार
वेशभूषा बदलून बदलून त्यांनी मेहनत केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला काय करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्या दोघांच्या मधात नाक खुपसत नाही. त्यांनी आमच्या नाकाखालून सरकार काढलं. आमच्या मोर्च्यात वऱ्हाडी इतकी गर्दी नव्हती अशी टीका भाजप करत असेल तर भाजपच्या वऱ्हाडात किती लोक होती हे दाखवावं. समृध्दीचे उद्घाटन आमच्या कार्यकाळात 1 मे ला होणार होते. पण एक पूल नादुरुस्त असल्याने कार्यक्रम पुढे गेला. आताच शिर्डीपर्यंत टोल इतकं आहे तर मुंबई पर्यंत विचारायला नको. जो व्हिडिओ वायरल होतोय त्यातले फोटो शोधा आणि त्यांना विचारा त्यांचा बोलविता धनी कोण आहे. हे सरकार खोके सरकार सोबतच स्थगिती सरकार आहे. उपराजधानी म्हणून नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीला अधिक निधी दिला. उद्धव ठाकरे या अधिवेशनात सहभागी होणार आहे. उद्या ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली बैठक होणार आहे. सावरकर यांना भारतरत्न द्यावा ही शिवसेनेची मागणी आहे. सामनामधून देखील यावर अग्रलेख आला आमची भूमिका स्पष्ट आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
महाविकास आघाडीवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यांना स्वत:चं सरकार टिकवता आलं नाही. त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि सरकार स्थापन केलं. त्यामुळे ते कशाच्या आधारावर वल्गना करत आहेत. हे सरकार टिकणार आहे आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा निवडणूक लढणार आहोत. महाराष्ट्रात पुन्हा आमचंच सरकार येणार आहे,” असं विधान फडणवीसांनी केलं.