मुंबई,दि.२३: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा (corona) नवी व्हेरिएंट ओमिक्रॉनचे (omicron) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनची (Omicron Variant) प्रकरणे जगभरात वाढत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञांना भीती आहे की, कोविडचा हा नवीन प्रकार जगात पुन्हा एकदा महामारीला धोकादायक बनवू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने देखील ओमिक्रॉनला (Omicron) चिंतेच्या प्रकारात समाविष्ट केले आहे.
देशातही ओमिक्रॉनची (Omicron Variant) प्रकरणे वाढत आहेत. भारतात ओमिक्रॉनची प्रकरणे (Omicron Cases) झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत.
ओमिक्रॉन रुग्णांची संख्या याच वेगाने वाढत राहिल्यास येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू (Night Locdkown) लागू होऊ शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना तसे संकेत दिले. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच महत्त्वाची बैठक बोलावली होती. देशाचे पंतप्रधान ओमयक्रॉनच्या परिस्थितीबाबत गांभीर्याने विचार करत आहेत. वरिष्ठ पातळीवर नाईट लॉकडाऊनची चर्चा सुरु आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. काही गोष्टींचे योग्य वेळी गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार देशातील काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याविषयी चर्चा करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू होणार का, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.