मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारस्कर यांनी केले गंभीर आरोप

0

मुंबई,दि.21: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला.

मात्र मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदींच्या आधारावर मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगितले आहे. तसेच ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणासाठी नव्या आंदोलनाचीही घोषणा केली आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आला. मराठा समाज विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच मराठा आंदोलनात उभी फुट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

मनोज जरांगेंनी अनेकांची घर उद्धवस्त केली. जरांगेचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह सर्व पुरावे असल्याचा दावा  बारस्कर यांनी केला आहे. जरांगे हेकेखोर माणूस आहे. रोज पलटी मारतात. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही. आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे मनोज जरांगेंचे सहकारी बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

गुप्त मिटिंग घेतली

लोणावळा आणि वाशीत जरांगे यांनी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या. जरांगें सरकारला निवेदन देत नाहीत  असे गंभीर आरोप बारसकर यांनी केले आहेत. बारस्कर पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी 23 डिसेंबर रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे.

तिथे जरांगे पाटील आतमध्ये एक बोलले आणि बाहेर कॅमेऱ्यासमोर जाऊन दुसरंच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करीन. मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे पाटील यांनी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबत जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. दोन तास मिटिंग झाली. या अधिकाऱ्याने त्या बैठकीची रेकॉर्डिंग करून ठेवली आहे. ते निवृत्त होतील लवकरच. त्यानंतर जरांगे पाटील यांचं बिंग फुटणार आहे. जरांगे पाटील हे पारदर्शक नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो, असेही ते म्हणाले. 

जरांगेने उपोषणाचा बनाव केला

मनोज जरांगे यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी उपोषणाचा बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत, त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठा जरांगे यांनी उपोषण सोडताना देखील अट्टहास केला. जरांगे यांचे उपोषण श्रेयवादासाठी आहे. गरीब लोक आरक्षण मागतात. पण, जरांगेंवर JCB फुले उधळणारे लोक आले कुठून? यांना पैसे कोण देतं असे सवाल बारसकर यांनी उपस्थित केले आहेत. जरांगेविरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. 10 फेब्रुवारी रोजी आंदोलन सुरु करणार हे समाजाला सांगितले होते. उपोषणाला बसण्यापूर्वी मराठा बांधवांना जरांगेंनी विश्वासात घेतले होते. 

जरांगेनी शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त केली

जरांगेचे दादागिरी करणारे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. जरांगेनी चार शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त केली. जरांगेनी मराठ्यांची घरं उद्धवस्त केली. लक्ष कसं वेधून घेता येईल हे जरांगेला चांगलं माहित आहे. TRP मिळवण्यासाठी मुद्दाम तो पत्रकारांसमोर लोकांची मिडियाची फसवणुक होईल अशा भाषेत बोलतो. जरांगेची भाषा शिवराळ आहे असे अवनेक गंभीर आरोप बारसिकर यांनी केले आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here