अजय महाराज बारस्कर यांचे पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.24: अजय महाराज बारस्कर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी गंभीर आरोप केले होते. मनोज जरांगेंनी अनेकांची घर उद्धवस्त केली. जरांगेचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह सर्व पुरावे असल्याचा दावा  बारस्कर यांनी केला होता.

अजय महाराज बारस्कर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं. याउलट त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत आला तेव्हा कुणाचे कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहीलं? असाही सवाल अजय बारसकर यांनी केला. तसेच आपल्याकडे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप असल्याचा दावा अजय बारस्कर यांनी केलाय. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

अजय बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्या पाहुण्यांकडे वाळू काढायच्या इतक्या डंपर गाड्या कशा आल्या, रातोरात इतका पैसा कसा आला, वाळूचा धंदा चालतो, असा गंभीर आरोप केला. तसेच जरांगे यांनी संभाजीराजेंच्या नावाखाली पैसे खाल्ले, त्यांच्यावर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, असा दावा अजय बारसकर यांनी केला. असे अनेक गंभीर आरोप अजय बारस्कर यांनी केले आहेत.

उद्या पुन्हा 11 वाजता पत्रकार परिषदेत जरांगेंच्या विरोधात पुरावे सादर करणार असल्याचे बारस्कर यांनी सांगितले. “मी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि इतर चाचण्यांना सामोरे जायला तयार आहे. तुम्ही पारदर्शक असल्याचे म्हणतायत तर माझ्यासहीत तुम्हीही या चाचण्यांना समोर या. उद्या 11 वाजता इथे बॉम्ब फुटणार आहे. उद्या 11 वाजता या. मी खुलासा करेन. उद्या पत्रकार परिषद घेणारी लोक वेगळी असतील”, असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here