मंत्री अजयकुमार मिश्रा यांचे अजित पवार आणि शरद पवारांवर वक्तव्य

Ajay Kumar Mishra: अजित पवारांवर त्यांचे काकाही ...

0

सातारा,दि.१८: Ajay Kumar Mishra On Ajit Pawar And Sharad Pawar: मंत्री अजयकुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवारांवर त्यांच्या काकांचाही विश्वास नाही. शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते बनवणार होते. पण ऐनवेळी धमकी मिळाल्याने शरद पवारांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेते बनवले, अशा आशयाचं विधान अजयकुमार मिश्रा यांनी केलं.

अजित पवारांवर टीकास्त्र | Ajay Kumar Mishra

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानवरही प्रतिक्रिया दिली.

मंत्री अजयकुमार मिश्रा
अजित पवार आणि शरद पवार
अजित पवारांवर त्यांचे काकाही… | Ajay Kumar Mishra On Ajit Pawar And Sharad Pawar

पत्रकार परिषदेत अजयकुमार मिश्रा म्हणाले, “अजित पवारांवर त्यांचे काकाही विश्वास ठेवत नाहीत. शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला विधानसभा विरोधी पक्षनेता बनवणार होते. ऐनवेळी मिळालेल्या धमकीमुळे अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद दिलं.” मुख्यमंत्री पदासाठी तडजोड करणारी ही लोक आहेत, असा टोलाही अजयकुमार मिश्रा यांनी लगावला.

“छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं. धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या व्यक्तीला ते धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या व्यक्तीवर मी काय टिप्पणी करू,” असंही मिश्रा म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here