Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस

0

नाशिक,दि.17: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) नोटीस बजावण्यात आली आहे. तिला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या तहसिलदारांनी नोटीस बजावली आहे. थकीत अकृषक कराचा (जमीनीचा कर) भरणा करण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसह 1200 मालमत्ताधारकांना सिन्नरच्या तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण? | Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्या रायची आडवाडीच्या डोंगराळ भागात सुमारे 1 हेक्टर जमीन असल्याची माहिती मिळत आहे. याच जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे 21,970 रुपये थकल्याने ऐश्वर्याला नोटीस पाठण्यात आली आहे. ऐश्वर्यासोबत 1200 इतर मालमत्ता धारकांना देखील ही नोटीस पाठण्यात आली आहे. मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Aishwarya Rai Bachchan
ऐश्वर्या राय बच्चन

1200 जणांना नोटीस

दरम्यान, फक्त ऐश्वर्याच नाही, तर 1200 मालमत्ताधारकांना सिन्नरच्या तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, पवनऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुझलॉन कंपनीत अनेक नेते, अभिनेत्यांची गुंतवणूक असल्याचं कळतंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here