अहमदाबाद,दि.१२: Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताची (Air India Plane Crash) बातमी आहे. अपघातस्थळावरून आकाशात काळा धूर निघताना दिसत होता. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विमानात क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. अहमदाबाद पोलिस कंट्रोल रूमने याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला.
विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून धुराचे काळे ढग आकाशात उडताना दिसत आहेत.

घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही. मेघनीनगर परिसरातील धारपूरमधून प्रचंड धूर दिसत आहे. बीएसएफ आणि एनडीआरएफ पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. अपघातग्रस्त विमान बोईंगचे ७८७ ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे, जे ११ वर्षे जुने होते.
अपघात कसा झाला? | Air India Plane Crash
विमानाने आपल्या नियोजित वेळेनुसार अहमदाबादहून उड्डाण घेतले होते. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला हे विमान थेट जमिनीवर आदळले. हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या भागात घरे आहेत. विमान कोसळल्यानंतर त्याला लगेच आग लागली.
सगळीकडे धुराचे लोट | Ahmedabad Plane Crash
या विमानाला दुर्घटना झाल्यानंतरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये धुराचे मोठे लोट दिसत आहेत. म्हणजचे अपघातानंतर या विमानाला लगेच आग लागली आहे. या विमानात 242 प्रवासी होते. अपघातग्रस्त विमानाचे नाव AI171 असे असून या अपघातात काही जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.