अॅडव्होकेट गुणरत्ने सदावर्ते यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, सदावर्ते यांना पोलिस कोठडी

0

मुंबई,दि.९: अॅडव्होकेट गुणरत्ने सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सदावर्ते यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी काल (दि.८) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर चप्पल व दगडफेक केली. एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) २२ एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांवर महामंडळाने कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले होते. असे असताना शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) अटक केली आहे. त्यानंतर, न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर किला न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन अर्ज फेटाळत दोन दिवसांची म्हणजेच ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य १०९ जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

किला न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सदर निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती कैलास सावंत यांनी निकाल दिला आहे. प्रथमदर्शनी पोलीस तपासात आरोपींविरोधात सक्षम पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच सदावर्ते यांचा जामीन अर्ज फेटाळताना वरील न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. 

सरकारी वकिलांचा आक्षेप

एसटी कामगारांच्या आंदोलनामागे दुसरा व्यक्ती आहे. काही व्यक्तींच्या चिथावणी खोर वक्तव्यांमुळे आंदोलन केले जाणार होते. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बाबतीत वारंवार वक्तव्य केली जात होती. रॉयल स्टोन येथेदेखील आंदोलन होणार होते. कामगारांच्या कालच्या हिंसक आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज घटना स्थळाचे जप्त केले आहेत. यामागे काही लोकांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयात सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. तसेच सदावर्ते यांच्या जामीन अर्जावर आक्षेप नोंदवण्यात आला.

मराठा आरक्षणा विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केली. त्याबद्दलचा  युक्तीवाद सदावर्ते यांनीच न्यायालयात केला आहे. त्यामुळे, त्यांना नेहमी चुकीची वागणूक दिली जात आहे. विशेष म्हणजे आज सादर केलेल्या FIR मध्ये अनेक गोष्टी या मॅाडीफाईड केल्या गेल्या आहेत, अशी बाजू गुणरत्न सदावर्तेंचे वकिल महेश वासवानी यांनी न्यायालयात मांडली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here