सोलापूर,दि.७: फसवून लग्न करून अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी विजय यादव सरवदे रा. मोहोळ या आरोपीस फसवून लग्न करून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकिकत अशी की, फिर्यादी त्यांच्या मामीकडे लहानपणापासुन राहण्यास आहे. फिर्यादीचे इयत्ता 12 वी व जीएनएम शिक्षण झालेले आहे. फिर्यादी सन 2011-2012 मध्ये सरदार नरसिंग कॉलेज मोहोळ येथे शिकण्यास होते. त्या कॉलेज मध्ये फिर्यादी व आरोपीची ओळख झाली होती त्यानंतर विजय सरवदे हे फिर्यादीशी संपर्क करत होते.
संपर्कात येवुन सुरुवातीला मैत्रीच्या माध्यमातुन फिर्यादी सोबत वेळोवेळी मोबाईलवरुन मेसेज व कॉल करुन तसेच सतत फिर्यादीला कॉलेजच्या बाहेर भेटण्यास येण्यास सांगुन तसेच फिर्यादीचा पाठलाग करून ते फिर्यादीला नेहमी तु फार सुदंर आहेस, तु मला फार आवडतेस आपण दोघे पळून जावुन लग्न करु असे वेळोवेळी बोलुन फिर्यादी सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीला सतत शरीर सुखाची मागणी करत होता.
विजय सरवदे हे फिर्यादीला नेहमी फोन करुन तु जर माझी नाही झालीस तर मी जिव देतो असे म्हणून मला भावनिक करुन तो फिर्यादीला म्हणाला की, “मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे” असे म्हणुन मोहोळ येथील पिंपरी-कुरुल रोड येथील एका शेतामध्ये कोणी नसताना सन 2013 मध्ये नक्की तारीख वेळ वेळ आठवत नाही. त्या शेतामध्ये फिर्यादीला घेवून जावून फिर्यादी नको म्हणत असताना बळजबरीने शरीरसंबंध ठेवले.
त्यानंतर तो फिर्यादीचा वारंवार पाठलाग करुन फिर्यादीला नेहमी भेटण्यास बोलावुन फिर्यादीच्या इच्छेविरुध्द नको म्हणत असताना फिर्यादीवर अत्याचार करत होता. फिर्यादीला सतत शरीर सुखाची मागणी करु लागला व तु जर मला शरीर सुख नाही, दिली तर मी आत्महत्या करतो असे म्हणुन फिर्यादीच्या इच्छेविरुध्द दि. 16/11/14 रोजी सोलापूर येथुन सोलापूर सांगली या बसने विटा येथे उतरलो. विटा येथील त्यांच्या भाड्यांच्या घरी घेवुन जावुन फिर्यादी नको नको म्हणत असताना सुध्दा बळजबरीने भाडयाच्या घरात कोणी नसताना शरीर संबंध ठेवले.
दि. 17/11/2014 रोजी त्यांनी फिर्यादीला आपण परत लग्र करु असे म्हणून त्यांनी मला विटा येथुन सोलापूर येथील टिकीट काढून त्यांनी मला सोलापूर येथील बसमध्ये बसविले परंतु आरोपी फिर्यादीशी लग्र करणार नाही अशी शंका आल्याने फिर्यादी आटपाडी येथे आले असता त्यांना फोन केला असताना आरोपी आटपाडी येथे येवुन फिर्यादीला अकलुज येथे त्यांच्या मित्राच्या घरी घेवन गेला.
तेथे आरोपीचा मित्र यांनी आम्हाला समजावुन सांगितले व लग्न केल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणाल्यावर दि. 18/11/2014 रोजी दुपारी 03.00 वाजण्याच्या सुमारास विजय यादव सरवदे यांनी अकलुज येथुन थोडेसे बाहेर गावाचे नाव आठवत नाही मोटार सायकलवर घेवुन जावून एका देवीच्या मंदीरात फिर्यादीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधले. त्यादरमयान फिर्यादी गरोदर असल्याचे समजले तेव्हा फिर्यादी आरोपीच्या आई वडीलांकडे मोहोळ येथे गेली.
तेथे त्यांनी फिर्यादीला मारहाण शिवीगाळी करुन गाडी करुन फिर्यादीला फिर्यादीच्या माहेरी पाठविले व फिर्यादीला व फिर्यादीच्या आई वडीलांना तुमच्या मुलींची लग्न कशी होतात असे म्हणुन धमकी दिली. व त्यानंतर आरोपी परत मे. 2015 मध्ये परत फिर्यादीच्या माहेरी आला फिर्यादी गरोदर असल्याचे सांगितल्यावर त्यांनी फिर्यादीला हे मुल नको म्हणुन बाळे येथील हॉस्पीटल घेवुन जावुन फिर्यादीला अबॉरशन कर म्हणुन सांगितले.
परंतु डॉक्टरांनी सही मागितल्यावर आरोपीने सही करण्यास नकार देवुन मोहोळ येथे घरी घेवुन गेला. तेथे आरोपीच्या घरी असलेली एक स्त्री हीने मी स्नेहा आहे मी त्यांच्या लग्नाची बायको आहे. तु कुठून आली तु कशी काय गरोदर असे म्हणुन फिर्यादीला मला विजय सरवदे त्यांची आई कमल सरवदे व स्नेहा सरवदे यांनी शिवीगाळ मारहाण करुन धमकी देवुन हकलून दिले. अशा आशयाची फिर्याद मोहोळ पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.
सदर कामी आरोपी विजय यादव सरवदे यांनी अॅड. अभिजीत इटकर यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मिळणे कामी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे अर्ज दाखल केलेला होता. यात आरोपी तर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सदर आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये झालेले संबंध हे संमतीने झालेले आहेत व त्यामुळे त्यास जबरदस्तीने म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी विजय यादव सरवदे रा. मोहोळ यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. हनुमंत टेकाळे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. अभिजित पाटील यांनी काम पाहिले.