मंत्री आदिती तटकरे यांची लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती 

0

सोलापूर,दि.६: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.  e-KYC केल्यानंतर अनेक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रूपये मिळतात. मात्र ई-केवायसी करताना अनेक पात्र महिलांकडून चूक झाल्याचे आढळून आले आहे. 

ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला असल्याने पैसे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरण्यात चूक केली होती, त्यांना आता आपल्या अर्जात सुधारणा करण्याची पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मिडीयावर (X वर) पोस्ट करत या बाबत मोठी माहिती दिली आहे. 

आदिती तटकरे यांची पोस्ट 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!

e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here