मुंबई,दि.2: लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांचे मोठे विधान केले आहे. विधान निवडणुकीत महायुती सरकारने या योजनेत 2100 रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. सध्या महिन्याला 1500 रूपये मिळत आहेत. नुकतेच महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करण्यात आले आहेत. मात्र आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार आहे.
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. मूळ जीआरमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे देखील अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
यांची होणार चौकशी
चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी
एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार पडताळणी
ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार पडताळणी
आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार
लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी
ज्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या आहेत त्यांची पडताळणी होणार आहे. स्थानिक प्रधानाकडून तक्रारी आल्या आहेत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांची पडताळणी होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या मूळ जीआरमध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.