VBA Shivsena Alliance: ॲड प्रकाश आंबेडकर यांचं शिवसेने बरोबर युतीबाबत मोठं विधानं

0

दि.13: VBA Shivsena Alliance: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेने बरोबर युतीबाबत मोठं विधानं केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज युतीसाठी थेट शिवसेनेला साद घातली आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भविष्यात आपण शिवसेनेशी युती होऊ शकते. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकदा भेटलोही होतो. मात्र ही चर्चा पुढे गेली नसल्याचं आंबेडकर म्हणाले. आपण शिवसेनेबाबत सकारात्मक आहोत. मात्र, आपल्यासोबत कुणीच लग्न करायला तयार नाही, फक्त फिरवायला तयार असल्याची खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली. आता प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीच्या प्रस्तावाला शिवसेना काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

आंबेडकरांच्या यातून भविष्यात नव्या समिकरणाची चाचपणी सुरु केल्याचं बोललं जात आहे. सध्या काँग्रेससोबतची आंबेडकरांची आघाडीची चर्चा पुढे जात नसल्याने आंबेडकरांनी मैत्रीसाठी सेनेला चुचकारल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आंबेडकरांनी यातून शिवसेनेला राज्यात नव्या ‘शिवशक्ती-भिमशक्ती’च्या समिकरणासाठी साद घातली काय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करा

मुंबईतील शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त निशित मिश्रा यांनी या हल्ल्याच्या शक्यतेसंदर्भात सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांना एक पत्र लिहिलं होतंय. या पत्राचं काय झालंय असा सवाल आंबेडकरांनी विचारला आहे. तसंच या हल्ल्याची चौकशी नांगरे पाटलांकडून काढून घेण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here