मुंबई,दि.14: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रावर (Raj Kundra) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उद्योगपती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे आधीच अडचणीत सापडला आहे. त्यात आता त्यातच नव्यानं भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता त्याचं नाव आणखी एका प्रकरणात पुढे आलं आहे. मात्र यावेळी राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीचंही नाव पुढे आलं आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि धमकावल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बराई नावाच्या व्यक्तीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, काशिफ खान यांच्यासह काही लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण 2014 चं असून तक्रारीनुसार, राज आणि शिल्पानं बरई यांची एक कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.
प्रकरण काय आहे?
नितीन बराई यांच्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी पीडितेला फिटनेस व्यवसायात 1 कोटी 51 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. जर त्यानं यांच्या कंपनीची फ्रंचायजी घेतली आणि पुण्याच्या कोरेगाव परिसरात स्पा आणि जीम सुरु केली तर खूप फायदा होईल. मात्र नंतर काही सुरळीत न झाल्यानं आरोपींनी त्यांचे पैसे परत मागितले. त्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं.