अभिनेता शाहरुख खानच्या या कृत्याचं सोशल मीडियावर होत आहे कौतुक

0

अहमदाबाद,दि.19: अभिनेता शाहरुख खानचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. विश्वचषक 2023 चा (World Cup 2023) अंतिम सामना पाहण्यासाठी आज (19 नोव्हेंबर) अनेक बॉलिवूड स्टार्स अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियम येथील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो आशा भोसले यांच्यासोबत स्टेडियममध्ये बसून मॅच बघताना दिसत आहे. किंग खानच्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

शाहरूख खानचे होतंय कौतुक

नुकताच किंग खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आशा भोसले यांच्या हातात असणारा चहाचा कप शाहरुख घेतो आणि एका व्यक्तीच्या हातात देतो. शाहरुखच्या या कृत्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Maha (@mahasrk1)

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“तो खरोखर हिरो आहे आणि एक चांगला माणूस देखील आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या व्हायरल व्हिडीओवर केली आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “यामुळे सगळं जग शाहरुखवर प्रेम करतं”

शाहरुख खान हा त्याच्या संपूर्ण कुटुंबासह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मॅच बघायला गेला आहे. किंग खानसोबत त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan), मुलगा आर्यन खान आणि लेक सुहाना खान हे देखील वर्ल्डकपची फायनल मॅच बघायला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेले आहेत. तसेच रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी हे कलाकार देखील वर्ल्डकपची फायनल मॅच बघायला अहमदाबादमध्ये गेले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here