Deepak Tijori: अभिनेता दीपक तिजोरीची 2.6 कोटींची फसवणूक, निर्मात्यावर गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.20: बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक दीपक तिजोरीला (Deepak Tijori) कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘आशिकी’सारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्याने त्याचे सहनिर्माते मोहन नाडर (Mohan Nadar) यांच्याविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दीपकनं मुंबईमधील (Mumbai) अंबोली पोलीस स्टेशन (Amboli Police Station) येथे 15 मार्च रोजी थ्रिलर चित्रपटाचा सह-निर्माता मोहन नाडरच्या विरोधात तक्रार दाखल केली. दीपकनं जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी मोहन नाडरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

मोहन नाडरवर गुन्हा दाखल

एका थ्रिलर चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सहभागी झालेल्या सह-निर्माता मोहन नाडरने (Mohan Nadar) 2.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दीपक तिजोरीने केला आहे. आयपीसीच्या कलम 420 आणि 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पैसे परत न केल्यानं तक्रार | Deepak Tijori

लंडनमधील (London) शूटिंग लोकेशनसाठी मोहन नाडरने पैसे घेतले, जे त्याने अद्याप परत केलेले नाहीत, असे दीपकने पोलिसांना सांगितले. आंबोली पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक तिजोरीनं आरोप केला की, 2019 मध्ये त्याने आणि मोहन नाडरने टिप्सी नावाच्या चित्रपटासाठी कॉन्ट्रेक्ट केले होते. त्यावेळी नाडरने दीपक तिजोरीकडून पैसे घेतले होते, ते परत मागितल्यावर त्याने दीपक तिजोरीला एकापाठोपाठ एक चेक दिले, परंतु ते बाऊन्स झाले. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दीपक तिजोरीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जो जीता वही सिकंदर (Jo Jeeta Wohi Sikandar), छोटी बहू (Choti Bahu), सडक (Sadak), आशिकी (Aashiqui), कभी हा कभी ना (Kabhi Haan Kabhi Naa), अंजाम (Anjaam) यांसारख्या चित्रपटांमुळे दीपकला विशेष लोकप्रियता मिळाली. टॉम, डिक अँड हॅरी या चित्रपटाचं दीपकनं दिग्दर्शन केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here