वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय
उस्मानाबाद,दि.07: नळदुर्ग येथे गेल्या काही महिन्यापासून अपघाताचे प्रमाण वाढत आहे.यात दुचाकीस्वार यांच्या डोक्याला मार लागून मृत्यू मृत्यूचे, गंभीर जखमी होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. हेल्मेटच्या वापराने अनेक दुचाकीस्वारांचे प्राण वाचतात. तेव्हा दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा,अन्यथा संबंधितांवर कार्यवाही केली जाईल,असे पोलिसांनी कळविले आहे.
दुचाकीस्वारांनी प्रवासादम्यान हेल्मेटचा वापर करुन या हेल्मेटविरोधी कारवाई अभियानामध्ये सहकार्य करावे.अपघातांना प्रतिबंध करण्याकरिता मुंबईचे अपर पोलीस महासंचालक डॉ.भुषणकुमार, औरंगाबाद येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, पोलिस,महामार्ग सुरक्षा पथक औरंगाबाद परिक्षेत्रांचे उप अधीक्षक डॉ.दिलीप टिप्परसे, औरंगाबाद मंडळांच्या पोलिस निरीक्षक नंदिनी चानपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग येथील महामार्ग पोलीस केंद्रामार्फत ऑक्टोंबर 2021 हा महिना विनाहेल्मेट दुचाकीस्वाराच्या विरुध्द कारवाई करण्याचे अभियान सुरु करण्यात आले आहे.
दुचाकीस्वारांनी यांनी प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर करुन या हेल्मेट विरोधी कारवाई अभियानास सहकार्य करावे,असे आवाहन नळदुर्ग येथील महामार्ग पोलीसांनी केले आहे.