सराईत गुन्हेगार नाजीम अब्दुल रहिम सालारवर MPDA कायद्यान्वये कारवाई

0

सोलापूर,दि.१: सोलापूर शहरातील एमआयडीसी, फौजदार चावडी, जेलरोड, सदर बझार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नाजीम अब्दुल रहिम सालार (Nazim Abdul Rahim Salar), वय ३३ वर्षे रा. ६०, सिध्देश्वर पेठ, सोलापूर यास एमपीडीए (MPDA) अधिनियम, १९८१ अन्वये दि.२८ /०२ /२०२२ रोजी स्थानबध्द केले आहे. नाजीम अब्दुल रहिम सालार हा मागील अनेक वर्षीपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भिती घालून नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी वर्तन केले आहे.

तो स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक यांना दहशत व भिती घालून अक्कलकोट रोड, नई जिंदगी जी ग्रुप विड़ी, लक्ष्मी मार्केट, सिध्देश्वर पेठ, सिव्हील चौक, विजापूर वेस, ताई चौक, अमन चौक, नई जिंदगी, पारशी विहीर, चमनशाह टेकडी, मक्का मशिद या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे.

या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरुन खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, गुन्हेगारी कट रचणे, बेकायदेशिर जमाव जमवून दगडफेक करणे आणि घराविषयी आगळीक करणे, शस्त्रानिशी फिरुन हल्ला करणे, मारामारी करणे, जुगार खेळणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो.

अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करुन नाजीम अब्दुल रहिम सालार याने परिसरात दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करुन स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे. नाजीम अब्दुल रहिम सालार याचे विरुध्द शहरातील एमआयडीसी, फौजदार चावडी, जेलरोड, सदर बझार पोलीस ठाण्यास १३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे व ०२ अदखलपात्र गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत.

त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०१० मध्ये क. १०७ फौ. प्र. सं अधिनियमानुसार, सन २०१४ मध्ये क.५६ (१) (अ) (ब) नुसार तडीपारची, सन २०२१ मध्ये क. ११० ( ई ) ( ग ) फौ. प्र. सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. नाजीम अब्दुल रहिम सालार याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२२ मध्ये अलीकडील काळात बंधपत्राचा भंग करुन त्याच्या साथीदारासह घातक शस्त्राद्वारे गंभीर दुखापत पोचुन गंभीर स्वरुपाचा स्वरुपाचा गुन्हा केला आहे. नाजीम अब्दुल रहिम सालार याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए (MAHARASHTRA PREVENTION OF DANGEROUS ACTIVITIES) अधिनियम, १९ ८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत.

त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची चौथी व या वर्षातील दुसरी कार्यवाही आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेशाप्रमाणे बापू बांगर पोलीस उपआयुक्त ( गुन्हे / विशा ) यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रिती टिपरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे संजय साळुंखे, पोउपनि / विशेंद्रसिंग बायस व विशेषतः एमपीडीए पथकातील अंमलदार पोना ८३३ विनायक संगमवार, पोना १२५४ सुदीप शिंदे, पोशि १९१६ अक्षय जाधव, पोशि १७१४ पांडुरंग धानुरे, पोशि ६५४ विशाल नवले यांनी व पोनि संजय पवार व शिवशंकर बोंदर यांचे सहकाऱ्याने सदरची कामगिरी पार पाडली आहे.

शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड, समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आली असून, सन -२०२२ मध्ये येवु घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एमपीडीए कायदयान्वये अशीच कारवाई चालू राहणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here